Mulgaon Khandoba Devsthan Badlapur marathi Information / श्री क्षेत्र खंडोबा देवस्थान मुळगाव मंदिर माहिती....

Mulgaon Khandoba Devsthan Badlapur marathi Information  :  बदलापूर मधील प्रसिद्ध देवस्थान म्हणजे मुलगावच खंडोबा मंदिर देवस्थान .... हिरवळ रानात निसर्गाच्या कुशीत अगदी मन मोहून टाकणार स्थळ . 

अस हे बदलापूर पासुन ९-१० किमीटर अंतरावर बसलेल मुळगाव . या गावाला प्रसिद्धी मिळाली ती तेथील असलेल्या खंडोबा देवस्थानचे मंदीरमुलेच   या लेखात आपण आज याच मंदिराची पूर्ण माहिती पाहणार आहोत. 

  • श्री क्षेत्र खंडोबा देवस्थान मुळगाव मंदिर माहिती..

Mulgaon Khandoba Devsthan Badlapur marathi Information / श्री क्षेत्र खंडोबा देवस्थान मुळगाव मंदिर माहिती....
Mulgaon Khandoba Devsthan Badlapur marathi Information

थंडीचे दिवस सुरु झाले कि सर्वांना चाहूल लागते ती थंड वातावरणात फिरायला जाण्याची मग ती महाराष्ट्रातील देवस्थाने असो ,किंवा इतर पर्यटन स्थळ ..... असच या भारत  मातेच्या भूमीवर आपल्या मराठी अस्मितेस मिळालेल अदभूत ठिकाण म्हणजे महाराष्ट्रतील बदलापूर शहरातील सौंदर्य म्हणजे मुलगावचे शिवकालीन मंदिर श्री क्षेत्र खंडोबा देवस्थान या मंदीराला महाराष्ट्राचा जुना काळ म्हणजेच शिवकालीन काळ लाभला आहे. 


Mulgaon Khandoba Devsthan Badlapur marathi Information tamper


येथे दरवर्षी मोठ्या थाटात खंडोबाची यात्रा अगदी उत्साहात साजरी केली जाते. हिवाळा असो पावसाळा असो किंवा उन्हाळा भाविक दर रविवारी मोठ्या संख्येने देवाची पूजा करण्यासाठी येथे जमलेले असतात. 


मंदिर विषय थोडक्यात माहिती : सदारनपणे मुळगाव येतील खंडोबा मंदिराला ९००-८०० पायऱ्या बांधण्यात आलेल्या आहेत. या पायऱ्या मुळात शिवकालीन नसून  भाविकांना मंदिरावर चढण्यासाठी सोईसकर व्हावं. म्हणून काही वर्षा पूर्वी या पायऱ्या बांधण्यात आलीच आहेत.(mulgaon Khandoba Devsthan Badlapur marathi Information)


पूर्वी दर्शनासाठी  सरळ डोंगरतुन वर चढाव लागत असे पण ..काही कला नंतर स्थानिकांनी या डोंगराच्या पायथ्यापासून  काही  अंतरापर्यंत पायऱ्यांचे बांधकाम केले होते. मात्र आता पूर्ण मंदीरापर्यंत चढण्यासाठी स्थानिकांनी भाविकांसाठी पायऱ्या उपलब्द करून दिल्या आहेत. 


मंदिरावरती चढताना सर्वात प्रथम पायत्याशी देवी भानूबाई च मंदिर आहे. तसेच वरती गडावर चडून जाताना देवाच्या पावलांचे दर्शन मिलते. या ठिकणी दोन ते तीन ठिकाणी देवाच्या पायांचे दर्शन बगायला मिळेल.


गडाच्या जवळ गेल्यावर मंदिराच्या अगदी मंदिरापासून काही अंतरावर चढताना आपल्याला खंडोबा देवाचे  वाहन घोड्याच्या पायाचे ठसे डाव्या बाजूला बघायला मिळतील.


 समोर पुठे चालत गेल्यावर दिसेल ते श्री मार्तण्ड मल्हारी देवस्थान खंडोबा मंदिर . मंदिर पाहून अखंड मनात येते ते म्हणजे यळकोट यळकोट जय मल्हार नावाचा जय घोष . 


बहुतेक सर्वात जास्त भाविक हे रविवार पहाटे मंदिरावर दर्शनासाठी येत असतात .त्याच कारण म्हणजे तेथील मनाला भुरळ घालणार सकाळच दृश्य.गार थंड हवा जस काही एक अनोखा जग पाहायला ,अनुभवायला मिळत.

 

चौबाजून भुरळ घालणार रान ,घनदाट झाडे. सकाळी पडणारी धुक्याची भुरळ ,सूर्य दयेचा सुंदर असा नजरा पोहयाला मिळत असतो.


Mulgaon Khandoba Devsthan Badlapur


डोंगाच्या चारही बाजूला पहिले असता एक अदभूत नजारा पाहायला बगायला मिळतो. मंदिरावरून डोंगराच्या एका बाजूस सुंदर असं बारवी धरण धरणाचं पाणी एका बाजूला सह्याद्रीच्या कुशीत असलेल्या सह्याद्री पर्वत रांगा तर एका बाजूला दूर वर पसलेला डोंगराळ सुंदर भाग तर एका बाजूस असलेला मानवी वसाहत सर्व नजरच जणू काही स्वर्गाहून हि सुंदर नजारा अनुभवायला मिळतो. 



  • या मंदिराविषयी असलेली प्रचलित माहिती         


मंदिराच्या आत मध्ये प्रवेश केल्यावर मंदिराच्या गाभाऱ्यात समोरचा खंडोबाच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा केली आहे त्याच ठिकाणी श्री. खंडोबा ,मालसा,आणि भानू अशी तीन शिवलिंगे बघायला मिळतील.{Mulgaon Khandoba Devsthan Badlapur}


 येथील गावकरी सांगतात कि या ठिकाणी एक थोटेसे छिद्र आहे. या छिद्रातून पूर्वी भंडाऱ्याची उधळण होत असे. परंतु कालांतराने ते छिद्र भूजल गेले आणि त्यातून येणार भंडारा बंद झाला.

 

  • येथे भरवण्यात येणारे उत्सव  

 

मार्गशीष महिन्यात चंपाषष्ठिला दुपारी २ च्या सुमारास हळद लावली जाते. त्यानंतर पौष महिन्यात शाकंभरी पौर्णिमेला सायंकाळी ५ वाटाण्याच्या सुमारास श्री खंडोबाच लग्न उत्सव वाजत गाजत केला जातो. या दिवशी भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी मंदिरात येत असतात.


 महाप्रसादाचे आयोजन ग्रामस्थांकडून केली जाते. तर दर वर्षी माघ महिन्यात पौर्णिमेला (हनुमान जयंतीला ) २ दिवसा करीत हि यात्रा भरवली जाते. 

या दिवशी हनुमानाची पालखी सर्व गावातुन फिरवून मंदिरात आणली जाते. यात्रेत दर वर्षी तेथील तलावाजवळ कुस्त्यांचा जंगी सामना भरवलं जातो.


तसेच संध्याकाळी  अनेक मनोरंजनाचे कार्यक्रम होतात. अशा प्रकारे दर वर्षी या गडावर दरवर्षी माघ महिन्यात हनुमान जयंतीला मोठ्या जोरात हि यात्रा भरावली जाते.    


  • कसे जायचे ?  Mulgaon kase jayache 

  • श्री क्षेत्र खंडोबा देवस्थान मुळगाव मंदिर माहिती..

 

जर तुम्हाला बदलापूर  वरून यायचे असेल तर अनेक मार्ग उपलब्द आहेत. बदलापूर बस डेपो वरून तुम्ही सरळ ( बदलापूर-डॅममार्गे-मुरबाड ) हि ST बस धरायची आहे. पुठे मुळगाव येते उतरावे . तसेच (बदलापूर - बोराडपाडा ) हि बस सुद्धा धरू शकता.


 बदलापूर पासून ९-१० किलोमीटर अंतरावर मुळगाव हे एक सुंदर गाव आहे.  मुरबाड वरून यायचे झाले तर (मुरबाड -डॅममार्ग -बदलापूर ) हि बस सेवा पकडावी. मुरबाड पासून मुळगाव हे २०-२१ किलोमीटर आंतर आहे .(Mulgaon Khandoba Devsthan Badlapur marathi Information )


जर अंबरनाथ हायवे वरून येत असाल तर सरळ अंबरनाथ -बदलापूर -राहटोळी-मुळगाव  असे यावे. तसेच बदलापूर वरून येण्यासाठी खाजगी इको सेवा उपलब्द आहे. बदलापूर ते मुळगाव. 



माहि कशी वाटली निक्की सांगा. आपल्या मित्रांना शेयर करायला मात्र विसरू नका. तुम्ही या आधी जर कधी मुळगाव पहिले नसेल तर एकदा नक्की भेट द्या . 

माझ्या खंडोबाच्या दर्शनाला जाऊन या मित्रानो . मग नंतर मला कमेंट सांगा कस वाटलं माझं मुळगाव.  अशीच माहिती साठी माझ्या (www.kinaramarathicha.com) site ला भेट द्यायला मात्र विसरू नका.  


Post a Comment

1 Comments

ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही . कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया या वेबसाईट ला सरकारी officel website मानू नये. या वेसाइटवरून तुम्हाला फक्त माहिती दिली जाते. जेणे करून तुम्हाला समजावे जगात काय चाललंय. धन्यवाद