अक्षय तृतीया का साजरी करतात ? पहा संपूर्ण माहिती / Akshay Trutiya information in marathi

 

अक्षय तृतीया 

Akshay Trutiya information in marathi - वैशाख  शुद्ध तृतीया म्हणजे अक्षय तृतीया होय.हा सातेतीन शुभ मुहूर्ता पैकी एक मानला जातो.अक्षय म्हणजेच ज्याचा अंत होत नाही असा,वर्षभर कालगणने मध्ये तिथींचा क्षय होत असतो.पण वैशाख शुद्ध तृतीया या तिथीचा कधीही क्षय होत नाही.


Akshay Trutiya information in marathi
Akshay Trutiya information in marathi



म्हणून लोकांची अशी मान्यता आहे कि या दिवशी सुरु केलेल्या कोणत्याही शुभ कार्याचे फळ ‘अक्षय्य’ (न संपणारे) असे मिळते.त्या मुले या दिवशी नवीन कामाची सुरुवात केली जाते.

Akshay Trutiya information in marathi

तसेच लोक दानधर्म करतात.मोल्यवान वस्तूंची खरेदी केली जाते.हा दिवस अखातीज या नावानेही मानला जातो.खान्देशात आखाजीम्हणून हा सन ओळखला जातो.ज्याचा क्षय होत नाही तो अक्षय्य.


देव आणि पितरांना उद्देशून जी काही कामे केली जातात ती अविनाशी असतात.म्हणजेच ती अक्षय असतात. या दिवशी केलेलं दान,हवन कधीही क्षयाला ताज नाही.


असे मानले जाते.या दिवशी पितरांना उद्देशून अपिंडक श्राद्ध केल्याने अल्पांशाने तरी त्यांच्या ऋणातून मुक्त होता येत अस मानल जात. (Akshay Trutiya information in marathi)


आपल्या उन्नतीसाठी पितरांचे आशीर्वाद घ्यावेत.म्हणून या दिवशी अपिंडक श्राद्ध व तिलतपर्ण केले जाते.


तसेच या दिवशी आपले पूर्वज आपल्या सभोवती वास करतात असे मानले जाते. आपल्या पूर्वजांच्या स्मुतींना उजाळा देण्यासाठी पितरांचे स्मरण करून त्यांच्या प्रतिमेचे पूजन केले जाते.या दिवशी मातीचे दोन घागरी एवढे मडके आणून,त्यात पाणी भरून त्यात वाला टाकतात.


त्याने या पाण्याला सुगंधित येतो.पळसाच्या पानांच्या केलेल्या पत्रावळीत व द्रोणात खीर आंब्याचे पन्हे किंवा चिंचोली,पापड,कुरड्या इत्यादी वाढतात.सुगंधित पाण्याने भरलेला घट दान केला जातो. काही लोक पाण्याने भरलेल्या कलशांचे पूजन करतात या दोन कलशांना कर्हा व केली असे म्हणतात. 


हि आपल्या पूर्वज माता पित्यांचे प्रतिक मानून त्यांचे पूजन केले जाते त्याच्या  पुठे कैरी ठेवली जाते व खीर तसेच इतर पदार्थांचा नैवद्य दाखवला जातो असे केल्याने पितरांचा आत्मा शांत होतो असे म्हाणले जाते.


Akshay Trutiya information


हा दिवस अक्षय मानला जात असल्याने या दिवशी लग्न केल्यास वैवाहिक जीवन समृद्धीने जाते असे मानले जाते.त्यामुळे या दिवशी राज्यस्थान,मध्य प्रदेश,छातीसगड,उडीसा,बंगाल आणि महाराष्ट्र  सारख्या देशात खूप मोठ्या प्रमाणात लग्न लावले जातात.


 अश्याच अक्षय तृतीय विषय अनेक कथा प्रचलित आहेत.गंगा नदी या दिवशीच पृथ्वी तलावर अवतरली असे मानले जाते. {Akshay Trutiya information in marathi} महर्षी व्यासांनी याच दिवशी गणपतीस लेखणी देऊन महाकाव्य महाभारत लिखाणास प्रारंभ केला,तसेच वनवासातील पाच पांडवांना श्री कृष्णानि अन्न देणारे अक्षय पात्र दिले असेही मानले जाते.


श्री कृष्णाचा बालमित्र सुदामा याच दिवशी पोहे घेऊन कृष्णाच्या भेटीला आला व रिक्त हाताने परत गेला त्याचे घराचे रुपांतर एका महाकाळ घर मध्ये झाले होते. अशी कथा हि याचा दिवशी घडली असे सांगितले जाते.


तसेच परशु रामाचा जन्म याच दिवाशी झाला असे मानले जाते. एक व्यापारी होता.तो नेमाने दानधर्म करायचा.त्याला कालांतराने दारिद्र आल.एकदा त्याने ऐकल तृतीया आल्यास त्या दिवशी केलेलं दान पुण्य अक्षय्य होतं.


तो दिवस आल्यावर त्याने दान केल,पुढल्या जन्मी तो कुशावती नगरीत राजा झाला. त्याने यज्ञ केल,वैभव भोगालं.परंतु त्याच्या पुण्याचा क्षय झाला नाही.


या दिवशी लक्ष्मी व कुबेराने समृद्धी साठी शंकराची व्रत केले त्यामुळे लक्ष्मी धन व कुबेर देवाचा खजिनदार झाला असे मानतात.याच दिवशी अन्नपूर्णेचा जन्म झाल्याचे सांगितले जात.


अश्या प्रकारे हा दिवस म्हणजे पूर्वजांचा आशीर्वाद मिळवण्याचा,दानधर्म करून अक्षय पुण्य मिळवण्याचा, अक्षय समृद्धी मिळवण्याचा दिवस,विविध धार्मिक कर्म,नवीन कार्याचा शुभारंभ व धन व संपतीचा खरेदीत साजरा केला जातो. (Akshay Trutiya information in marathi) या दिवशी मिळालेले सर्वकाही अक्षय राहते. हीच या दिवसामागची लोकभावना.


हे पण नक्की वाचा .....!


१) रामाचा पाळणा कश्या प्रकारे साजरा करतात - पहा 

२) श्रावण महिन्याची संपूर्ण - पहा 


महाराष्ष्ट्रातील सुंदर पर्यटन स्थळे पहा 


१) माळशेज घाट पहा संपूर्ण माहिती - पहा 

२) ठाणे बदलापूर शहराचे सर्वात मोठे बारवी धरण - पहा 

३) नाणेघाट एक सुंदर पर्यटन स्थळ - पहा  


Post a Comment

0 Comments